⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी शहरातील दीड दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.तसेच तालुक्यातील दीड दिवसीय गणपती बाप्पांचे उशिरापर्यंत विसर्जन चालू होते.
सावंतवाडी शहरातील दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर च्या नामघोषात उशिरापर्यंत हे विसर्जन चालू होते. तालुक्यातील गावागावातील दीड दिवसीय गणपतींचेही आज थाटात विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी लवकर विसर्जन करण्यात आले तर काही ठिकाणी उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते.
