देवगड
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी देवगड बाजारपेठ तसेच तारामुंबरी येथील श्री खवळे महागणपतीचे व आजूबाजूच्या परिसरातील श्री गणेशाचे दर्शन घेऊन गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.या वेळी त्यांच्यासमवेत तालुका प्रमुख मिलिंद साटम,माजी सभापती रवींद्र जोगल,देवगड जामसंडे नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती नगरसेवक संतोष तारी, बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी तालुका सहसंपर्क प्रमुख संजय जगताप अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांनी घेतले खवळे महागणपतीचे दर्शन
