⚡कणकवली ता.०१-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालेतील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु. संस्कारा सोमा कदम हिने भारत सरकार मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास (एनएमएम एस) परीक्षेत सुयश प्राप्त केले.
त्याबद्दल तिचे बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष मधुकर वाडेकर व पदाधिकारी, बिडवाडी गावचे सरपंच,सदस्य व पोलीस पाटील ,पिसेकामते गावचे सरपंच,सदस्य व पोलीस पाटील ,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष व पदाधिकारी, शिक्षक पालक संघ अध्यक्ष व पदाधिकारी, शाळा दक्षता समिती अध्यक्ष व पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य एस. डी.जोशी, प्राध्यापक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तिला हे यश प्राप्त करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य एस. डी. जोशी. शिक्षक ए. के. कांबळे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले
