Headlines

कल्पना मलये यांच्या कारटो बाल ग्रंथाला मसापचा पुरस्कार जाहीर

⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र साहित्य परिषदेचे 2021 या वर्षातील विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारामध्ये कणकवलीतील शिक्षिका कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बालग्रंथाचा समावेश आहे.


पुणे येथील एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ज्येष्ठ हिंदी लेखिका सूर्यबाला यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या बाल ग्रंथाला व्ही. व्ही. बोकील स्मृती पारितोषिक जाहीर झाले आहे. कल्पना मलये या कणकवली जि. प. शाळा नंबर 5 येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारटो या बालवांग्मय ग्रंथाच्या पहिल्या दोन आवृत्ती हातोहात संपल्यानंतर. तिसरी आवृत्ती ही प्रसिद्ध झाली. बालसाहित्यात लोकप्रिय झालेल्या ‘कारटो’ या ग्रंथासाठी या पुरस्काराची निवड झाली आहे. या निवडीबद्दल कल्पना मलये यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page