सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण उद्या जिल्हा दौऱ्यावर

⚡सावंतवाडी ता.३१-: सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण हे उद्या १ सप्टेंबर रोजी एका दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचा सुधारित दौरा पुढीलप्रमाणे-पहाटे ०३.०० वाजता पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून मुंबई विमानतळाकडे प्रयाण, पहाटे ०४.०० वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन, पहाटे ५ वाजता गोवा विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ६.२० वाजता गोवा एअरपोर्ट येथे आगमन व पेंडूरकडे प्रयाण, सकाळी ९ वाजता पेंडूर येथे आगमन व राखीव, दुपारी ०१.३० वाजता पेंडूर येथून नेमळेकडे प्रयाण, दुपारी ०२.०० वा. ३. नेमळे येथे आगमन व नेमळे ग्रामसचिवालयास भेट, दुपारी ०२.४५ वाजता नेमळे येथून तळवडेकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वाजता तळवडे येथे आगमन व राखीव, सायंकाळी ०५.०० वाजता म्हापसा, कानका (गोवा राज्य) कडे प्रयाण, सायंकाळी ०७.०० वाजता म्हापसा, कानका (गोवा राज्य) येथे आगमन व श्री. गणेश दर्शन, रात्री ९ वाजता म्हापसा, कानका येथून गोवा विमानतळाकडे प्रयाण, रात्री १०.३० वाजता गोवा एअरपोर्ट येथे आगमन, रात्री ११.५५ वाजता मुंबईकडे प्रयाण, शुक्रवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ००.३५ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-२) येथे आगमन व पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण असा दौरा असणार आहे.

You cannot copy content of this page