देवगड येथील प्रथमेश मांगले यांची इजिप्त येथील गॅलक्सि केमिकल कंपनीत सिनिअर ऑफिसरपदी निवड*

⚡देवगड ता.३०-: देवगड बाजारपेठ येथील रहिवासी श्री. प्रथमेश नेमिनाथ मांगले (३०)यांची इजिप्त येथील गॅलक्सि केमिकल कंपनी मध्ये सिनिअर ऑफिसर पदी निवड झाली असून त्यांनी या पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे.
प्रथमेश मांगले यांनी आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षण देवगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे पूर्ण करून त्यानंतर रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडमी येथून केमिकल इंजिनीअर पदवी संपादित केली.त्यानंतर नागोठणे सुप्रीमो पेट्रोकेमिकल व लोटे येथील केमिकल कंपनी मध्ये सेवा बजावून नुकतेच ते इजिप्त येथील कंपनीत रुजू झाले आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.देवगड बाजारपेठ येथील व्यापारी नेमिनाथ उर्फ नंदू मांगले यांचे ते चिरंजीव ,व पत्रकार दयानंद मांगले यांचे सख्खे पुतणे होत.

You cannot copy content of this page