⚡देवगड ता.३०-: देवगड शहरात हरितालिका व्रत पूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देवगड बाजारपेठ या ठिकाणी नंदू मांगले यांच्या निवासस्थानी हरितालिका व्रत पूजन सोहळा पार पडला. ग्रामोपाध्ये उदय जोशी यांच्या पौरोहित्याखाली विधिवात हरितालिका मातेचे पूजन यजमान सौ. ऐश्वर्या प्रथमेश मांगले यांनी प्रथम पूजन केले.
यावेळी देवगड बाजारपेठ परिसर परिसरातील सौभाग्यवती ,सुहासिनी यानी हरितालिका मातेची पूजा केली .त्यानंतर आरती ,प्रसाद वाटप करण्यात आला.
फोटो-देवगड बाजारपेठ येथे श्री मांगले कुटुंबियांचे घरी हरितालिका माता पूजन करताना महिला भगिनी
