मळगाव शारदा विद्यालयात पार पडलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.३०सहदेव राऊळ-: मळगाव येथील प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्यावतीने आयोजित देशभक्तीपर गीतगायन व चित्र रंगवा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धा शारदा विद्यालय मळगाव येथे पार पडल्या.

गीतगायन स्पर्धा तिसरी व चौथीसाठी, तर चित्र रंगवा स्पर्धा पहिली व दुसरीसाठी तसेच तिसरी व चौथी या दोन्ही गटांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धांमध्ये शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मळगावचे सुपुत्र शाळेचे माजी विद्यार्थी सेवानिवृत्त इलेक्ट्रिक इंजिनीयर (मुंबई महानगरपालिका) सीताराम उर्फ नाना नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, संचालक बाळकृष्ण मुळीक, ग्रंथपाल आनंद देवळी, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सहशिक्षिका श्रीमती सावंत, श्रीमती गोवेकर, श्रीमती वारंग, ग्रामपंचायत सदस्या अनुजा खडपकर, शाळा व्यवस्थापन सदस्य गोपाळ नार्वेकर, विजय ठाकूर आदींसह विजेत्या स्पर्धकांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे कार्यवाह नार्वेकर यांनी केले. संचालक मुळीक यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे नाईक यांनी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो, असे सांगून शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. ग्रंथपाल देवळी यांनी आभार मानले. गीत गायन स्पर्धेचे परीक्षण मधुरा खानोलकर, वर्षा देवण यांनी केले.
स्पर्धांचा गटवार निकाल अनुक्रमे असा, चित्र रंगवा स्पर्धा ः पहिली ते दुसरी-धनश्री खडपकर, पूर्वेश खडपकर, लावण्या नाईक, उत्तेजनार्थ युगा तेंडोलकर, तेज मळगावकर, ममता आसयेकर. तिसरी ते चौथी-भूमी मेस्त्री, सोहम् मिशाळ, दुर्वा नार्वेकर, समीक्षा गोसावी, उत्तेजनार्थ योगिता कांबळी, प्रणव गावडे. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा-महेश कातळकर, अनुष्का सावळ, स्वरा चरकरी, उत्तेजनार्थ सानवी कुडव, आयुष गुडेकर यांनी यश मिळविले.
………………

You cannot copy content of this page