⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
मठबुद्रुक येथील संस्थेच्या कार्यालयात मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अजय हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी मठबुद्रुक विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सतीश उर्फ राजू परुळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . राजू परुळेकर यांनी गेली पाच वर्षे मठबुद्रुक विकास सोसायटीच्या संचालक पदी काम केले. तर आता त्यांची संस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री. हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी माजी जि. प. सभापती अनंत राऊत, उपचेअरमन बाळा येरम , जनार्दन सावंत , मोहन वेंगुर्लेकर, गुरुदेव केळुसकर, बाबा घाडी, श्रीमती शशिकला कांदळकर, भानुदास गायकवाड, उमाजी मालप, सोनू जंगले, अशोक कांदळकर, पाताडे, निकीता चव्हाण, सेक्रेटरी श्री. कदम, व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजु परुळेकर यांनी मठबुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ही सर्वात जुनी सोसायटी असून मठबुद्रुक गावच्या विकासासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत या संस्थेच्या वतीने शासकीय योजनांचा सभासदांना पर्यायाने गावाला कसा फायदा होईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. शेवटी बाळा येरम यांनी आभार मानले.
