आता काँग्रेसला घेवून दसरा मेळावा घेणार का ?;शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांचा सवाल
⚡सावंतवाडी ता.२९-: दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुत्व आणि मराठी माणसांचे विचार पुढे घेऊन जाण्याची प्रथा बाळासाहेबांनी घालून दिली होती मात्र आता शिवसेना काँग्रेसला घेऊन दसरा मेळावा घेणार आहे का असा सवाल आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित करत दसऱ्या मेळाव्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे हा वाद उपस्थित करण्याचा प्रश्नच येत नाही केवळ सहानुभूती घेण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याचे केसरकर म्हणाले.ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते
