शालेय पुस्तकातच देणार नोट्स

गरीब विद्यार्थ्यांचा वह्यांचा खर्च वाचणार;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२९-: राज्यात शालेय पुस्तकातच नोट्स वह्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे पुस्तकावरच पेजेस वाढवून त्याचे रूपांतर वह्यात करण्यात येणार आहे जेणेकरून गरीब मुलांची वहयांची समस्या दूर होऊ शकते हा यामागचा उद्येश आहे परंतु या संदर्भात अध्याप निर्णय झालेला नसून आम्ही हे करू शकलो तर महाराष्ट्रात नवी क्रांती घडेल असे माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

तर मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी एक पुस्तक तीन टप्प्यात देण्याच्या दृष्टीने आमचा विचार असल्याचेही सरकार म्हणाले तर शिक्षकांचा फोटो शाळेत लावण्याबाबत अद्यापही काहीच निर्णय झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांची संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत राजन पोकळे अनारोजीन लोबो बाबू कुडतरकर भारती मोरे ती उपस्थित होते.

You cannot copy content of this page