⚡मालवण ता.२९-: कराटे असोसिएशन ऑफ इंडिया व फिट इंडिया असोसिएशन यांची अधिकृत मान्यताप्राप्त किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परिक्षेत मालवणच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह हॉल येथे ही कराटे बेल्ट परिक्षा घेण्यात आली. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये येलो बेल्ट – कु. नाविन्य डोळस, कु. अदिती परब, युती यमकर, ऑरेंज बेल्ट – कु. मानस जुवाटकर, हेरंब वळंजू, अभिनंदन गरगटे, ग्रीन बेल्ट- रघुनाथ कांडरकर, महेंद्र कांडरकर. स्वयंम मुणगेकर, अस्मि चव्हाण, ज्युनिअर ब्लू बेल्ट -कु. कार्तिक सरमळकर, लौकिक मालवणकर सिनिअर ब्लू बेल्ट – कु. जुई गरगटे, ज्युनिअर ब्राऊन बेल्ट – कु. साई निकम, सिनिअर ब्राऊन बेल्ट- कु. अद्वैत नाईक यांनी यश मिळवले.
ही बेल्ट परिक्षा किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे परिक्षक व नॅशनल रेफ्रि विजय केळुसकर (फिक्स डॅन ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य प्रशिक्षक विजय केळुसकर, श्रावणी केळुसकर व सहप्रशिक्षक सानिका गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कराटे ही एक अशी कला आहे की ज्यामुळे आपण सहनशिलता, चपळाई, तल्लकता व आत्मविश्वास हे गुण अंगात भिनवू शकतो म्हणूनच प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व युवक-युवतीने कराटेचे शिक्षण घेतलेचे पाहिजे, असे प्रतिपादन किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कराटे प्रशिक्षक विजय रघुनाथ केळुसकर यांनी केले.
