⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहरात नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध “दत्ता भेळ” या दालनाचे आज शानदार उद्घाटन मारुती गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्यांदाच सुरू होत असलेल्या या दत्ता भेळ ने आपल्या ग्राहकांसाठी आज खास ऑफर ठेवली असून, ग्राहकांना आज मोफत भेळ खाता येणार आहे. त्यामुळे या दालनात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
सावंतवाडीत सुप्रसिद्ध “दत्ता भेळ” दलानाचा शुभारंभ
