चाकरमान्यांचे गुलाबपुष्प देवून करण्यात आले स्वागत

करूळ चेकपोस्टवर पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा उपक्रम

⚡वैभववाडी ता.२९ संजय शेळके-: गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हृयात दाखल झालेले चाकरमानी व गणेश भक्तांचे करूळ पोलीस चेक नाक्यावर पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मोफत चहा व पाण्याची व्यवस्था केली.

यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, हवालदार योगेश तांडेल, पोलीस संदीप राठोड, श्री. मोरे, श्री. पाटील आदी उपस्थित होते. गणेश चतुर्थी सणानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी व गणेश भक्त दाखल होत आहेत. करूळ घाट मार्गे आलेल्या सर्व भाविकांचे पोलिसांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व गणेश भक्तांची पोलिसांनी विचारपूस केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page