खासदार विनायक राऊत यांनी कणकवली येथे घेतले श्री श्री वामनाश्रम स्वामींचे दर्शन

⚡कणकवली ता.२९-: श्री संस्थान काशी तथा हळदीपुर मठाधीपदी श्री श्री वामनाश्रम महास्वामी सध्या १९ व्या चातुर्मास सोहळ्यानिमित्त कणकवली येथे वास्तव्यास आहेत. याचे औचित्य साधुन शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून श्री श्री वामनाश्रम महास्वामींचे दर्शन घेवुन आशिर्वाद घेतले. यावेळी स्वामींनी श्री.विनायक राऊत यांचा शाल व प्रतिमा देवुन सत्कार केला.
यावेळी त्यांच्यासोबत आलेले शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना युवानेते संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, शंकर पार्सेकर, अँड.हर्षद गावडे, सचिन सावंत, बंडू ठाकुर, उमेश वाळके, अँड.दिपक अंधारी, दादा कुडतरकर, सोहम वाळके, राजु पावसकर, बंड्या कोरगावकर, बाबु केनी, पप्या राऊत, मनीष राऊत यांनी देखील उपस्थित राहुन स्वामींचे दर्शन घेतले.

You cannot copy content of this page