भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली रेल्वे स्थानकात गणेशभक्त प्रवाशांचे केले स्वागत
⚡कणकवली ता.३०-:
भाजपा आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी दादरहून निघालेल्या मोदी एक्सप्रेस रात्री १० वाजता कणकवली रेल्वे स्थानकात दाखल झाली . सर्व चाकरमान्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले . आ . नितेश राणेंच्या संकल्पनेतून आणि औदार्यातून गणेशभक्तांना दादर ते कणकवली दरम्यान मोफत प्रवास मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून सलग दुसऱ्या वर्षी करता आला.प्रवासात दुपारचे दर्जेदार रुचकर जेवणही सर्व प्रवाशांना मोफत देण्यात आले होते.ऐन गणेशचतुर्थी काळात कोकणात गणेशचतुर्थीला जाण्यासाठी ट्रेन तिकीट उपलब्ध होत नाही , खाजगी लक्झरीचे भाडे काही हजारात असते . आ . नितेश राणेंनी चाकरमानी गणेशभक्तांची ही अडचण ओळखून गतवर्षीपासून खास मोदी एक्सप्रेस हि संपूर्ण ट्रेन गणेशभक्तांसाठी सुरू केली आहे .
आ . नितेश राणेंमुळे आमचा प्रवास सुखकर आणि निर्धोक झाला अशी प्रशंसा करतानाच नितेश राणेंच्या सर्व ईच्छा गणपती बाप्पा पूर्ण करू दे असे आशीर्वाद ही भाविक प्रवासी ट्रेनमधून उतरल्यानंतर देत होते . मोदी एक्सप्रेस मधून आलेल्या भाविक प्रवाशांचे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री , सोशल मीडिया जिल्हाप्रमुख समीर प्रभुगावकर , कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे , संदीप सावंत , कलमठ शक्तिकेंद्रप्रमुख स्वप्नील चिंदरकर , सदा चव्हाण , सचिन पारधीये , निखिल आचरेकर यांनी स्वागत केले .
