तरळे फणसगाव विजयदुर्ग मार्गावरील पाटगाव येथील घटना
देवगड-प्रतिनिधी
तरळे-फणसगांव-विजयदुर्ग महामार्गावरती पाटगांव दत्तमंदिर नजीक झालेल्या वळणावरती ट्रक टेम्पो यांची समोरासमोर धडक होवून एक तरुण जागीच ठार.
मिळालेल्या माहितीनुसार 25ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वा. सुमारास तळेरे वरुण येणारा ट्रक क्रमांक एमएच 09 सीव्ही 7126 याने वाघोटण वरुन तळेरे कडे जाणारा बोलेरो टेम्पो क्र एमएच 07 एजे 2749 याला ट्रकने समोरुण धडक दिल्याने बोलेरो मध्ये मागे बसलेले चंद्रकांत विठठल गुरव रा.सौंदाळे यांचा जागीच मृत्यू झाला असून सदर प्रकाराची सर्व माहिती विजयदुर्ग पोलीस स्थानकात देण्यात आली असता तात्काळ पोलीस सहायकनिरिक्षक भारत फार्ले,अवधुत गुणीजन,संतोष गणुले,दिपेश तांबे घटनास्थळी भेट देवून मयत विठठल गुरव यांना शवविच्छेदनासाठी देवगड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. तदनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
फोटो- तरळे-फणसगांव-विजयदुर्ग महामार्गावरती झालेल्या अपघातामध्ये ट्रकचे झालेले नुकसान
