फळमाशीचा प्रादुर्भावामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान

तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची मागणी

⚡देवगड ता.२५-: तालुक्यात फळमाशीचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. देवगडमधील प्रमुख आंबा पीकाबरोबरच पेरू, केळी, चिकू तसेच भाजीपाला यांनाही फळमाशीचा प्रादुर्भाव
जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून फळमाशीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी कृषी
विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे तसेच तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,मागील आंबा हंगामापासून फळमाशीच्या उपद्रवामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे
अतोनात नुकसान झाले आहे. या फळमाशीचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. देवगडमधील
प्रमुख आंबा पीकाबरोबरच पेरू, केळी, चिकू तसेच भाजीपाला यांनाही फळमाशीचा प्रादुर्भाव
जाणवत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेली भाजी,
फळे फळमाशीमुळे नुकसानीत जात आहेत. फळमाशीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी कृषी
विभागाशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. तसेच या फळमाशीच्या
उत्पत्तीवर संशोधन होण्याची आवश्यकता आहे. नाहीतर फळमाशीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस
वाढण्याची शक्यता असून आगामी आंबा हंगामावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तरी आपल्या
मार्फत राज्य शासनास कळवून ही समस्या कायमची दूर करावी अशी तालुक्यातील आंबा
बागायतदार शेतकऱ्यांची मागणी तहसीलदार मारुती कांबळे तसेच तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर परब, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाळेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश पेडणेकर,श्यामकांत शेडगे,नागेश आचरेकर,बाबू वाळके,विश्वनाथ तेली, जयराम कदम, सरचिटणीस शरद शिंदे,सुधीर देवगडकर,उदय रमडे,कृष्ण परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page