स्वातंत्र्याच्या साक्षीदारांचा दांडेलीत गौरव

⚡बांदा ता.२५-: 1947 रोजी जन्मलेल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या सांगतेवेळी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेत सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्तीमध्ये रमाकांत पुनाळेकर, दत्ताराम मीशाळ, नारायण कामत, दिगंबर मालवणकर, दत्ताराम आरोलकर, शशिकांत नार्वेकर, गोपाळ परब, रमेश नाईक, चंद्रकांत पेडणेकर, प्रभाकर मयेकर, सुरेश कोरगांवकर, दीपलक्ष्मी मालवणकर या ज्येष्ठांचा सहभाग होता. सर्वांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी सरपंच, पालक तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठांनी 75 वर्षात पाहिलेला भारत आपल्या अनुभवातून बोलताना व्यक्त केला. याचा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात नक्कीच उपयोग होईल असे शाळा समिती अध्यक्ष कृष्णा मडूरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याविहार हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी केले. तसेच प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी केले. पालकांच्या चित्रकला स्पर्धेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. आभार मनोहर नार्वेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page