Headlines

मराठा समाजाच्या वतीने बांदा येथे गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
बांदा मराठा समाजाच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत बांदा शहर मर्यादित गणेश मूर्ती व आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी १ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्यात येणार असून तिसऱ्या व चौथ्या दिवशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परीक्षण करण्यात येणार आहे.
. स्पर्धेची सविस्तर माहिती मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी दिली. स्पर्धा हि बांदा शहर मर्यादित होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ २ क्रमांकांना प्रत्येकी १ हजार पाचशे रुपये रोख व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हि स्पर्धा खुली असून सहभागी सर्व स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी विराज परब (धन्वन्तरी मेडिकल स्टोअर्स, कट्टा कॉर्नर बांदा, मो. ९४०४२१४६६३) किंवा महिला मराठा समाज अध्यक्षा सौ. अवंती पंडित (मो. ९२८४५७७७९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेश चतुर्थी नंतर बांदा येथे आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page