सेवानिवृत्त शिक्षकांच्या रक्कमा
धनादेश न काढता त्यांच्या बँक खाती जमा करणार

सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागणीला आले यश

⚡कणकवली ता.२४-:
सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या निवृत्तीनंतर देय ठरणाऱ्या रकमा देण्यासाठी धनादेश काढण्याची काहीही गरज नाही असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांनी स्पष्ट केले. व आपल्या कार्यालयाकडून अपवाद वगळता असे धनादेश न काढता संबंधितांच्या रकमा त्यांच्या बँक खाती जमा करण्याबाबतचे लेखी आदेश काढण्यात येतील असे प्रतिनिधीना आश्वासन दिले. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, बाबू परब, लक्ष्मण प्रभु, प्रभाकर ढवळ, अनंत पालकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या निवृत्तीनंतर देय ठरणाऱ्या रकमा त्यांना सहन सुलभ देता याव्यात म्हणून निवृत्त होताना संबंधित कर्मचाऱ्याकडून बँक खाते उघडून घेतले जाते. त्या खात्याची छायांकित प्रत प्रशासनाकडे दिली जाते. त्यानंतर येणाऱ्या सर्व रकमा ह्या परस्पर बँक खात्यावर जमा केल्या जातात. निवृत्त तथा ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कार्यपद्धती अवलंबिली जाते. शासनानेही तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत असे असुनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही विकास गटाकडील अर्थ विभागाकडून संबंधित शिक्षकांची प्रशासनाकडे बँक खाती असूनही काही रकमा अदा करण्यासाठी हेतुपुरस्सर त्या शिक्षकांचे धनादेश काढले जातात. सदर धनादेश नेण्यासाठी निवृत्त शिक्षकांना स्थानिक पातळीपासून पुणे-मुंबई स्थित असणाऱ्या शिक्षकांना धनादेश नेण्यासाठी कार्यालयात बोलाविले जाते. ही बाब गंभीर असून त्याबाबत निवृत्त शिक्षक प्रतिनिधीनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांचेकडे लेखी तक्रार देऊन चर्चा केली आहे.
दि. १/१/२००६ ते दि. २६/०२/२००९ या कालावधीतील फरकाच्या देय रकमा देवगड विकास गटाकडून परस्पर खात्यावर जमा करण्यात आल्या. तर कुडाळ व कणकवली तालुक्याकडून जाणूनबुजून धनादेश काढले व शिक्षकांना कोणतेही कारण नसताना कार्यालयात येणे भाग पाडले. आजही कणकवली तालुक्यात सुधारित अंशराशीकरणाच्या फरकाच्या रकमा संबंधित शिक्षकांची प्रशासनाकडे बँक खाती असूनही त्यावर जमा न करता संबंधित सर्व शिक्षकांना मुंबई-पुण्यापासून कार्यालयात बोलविले जात आहे. यासाठी गट विकास अधिकारी कुडाळ व कणकवली यांच्याशी शिक्षक प्रतिनिधीनी समक्ष चर्चा करून हा प्रकार बंद करुन निवृत्त शिक्षकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत विनंती करण्यात आली.

चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली कारण ही हास्यास्पद आहेत. एका अधिकाऱ्याने रकमा मोठ्या असतात त्या इकडे-तिकडे होऊ नयेत म्हणून तर एका अधिकाऱ्याने रेव्ह्यू स्टॅम्प लावून सही लागते अशी कारणे दिली. शिक्षक प्रतिनिधींनी यातले कोणतेही कारण पटत नसल्याचे स्पष्ट केले. गटविकास अधिकारी कुडाळ यांनी चर्चेत आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना यापुढे बँक खाती असलेल्या कोणत्याही शिक्षकांचे धनादेश काढायचे नाहीत असे स्पष्ट तोंडी आदेश दिले. मात्र गटविकास अधिकारी कणकवली यांनी इतर तालुके काय व कसे करतात ते विचारून सांगतो असे सांगितले,

अखेर सर्वच तालुक्यातील अर्थ विभागाला स्पष्ट निर्देश देण्यासाठी मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page