राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा
सावंतवाडी ता.२४’:महावितरण कडून दरवेळी विविध वेगवेगळे शब्द वापरून अन्यायकारक रित्या ग्राहकांकडून विज बिलाच्या नावाने लुटमार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. यावेळी ही अन्यायकारक विज वाढ थांबवावी. अन्यथा जिल्हाभरात विज वितरण कार्यालयात धडक आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व व्यापार सेल कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, रत्नागिरी महिला राष्ट्रवादी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू,युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, इफ्तेकार राजगुरू, संतोष जोईल, हर्षद बेग नंदकिशोर नाईक, सिद्धेश तेंडुलकर, आसिफ शेख, नितीन सातपुते, सायली दुभाषी उपस्थित.
