बांदा/प्रतिनिधी
बांदा निमजगा येथील अंगणवाडीत बाल गोपाळानी दहीहंडी उत्साहात साजरी केली. यावेळी चिमुकल्यानी कृष्णाची वेशभूषा साकारली होती.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या स्वप्नाली पवार, अंगणवाडी सेविका सौ. वर्षा आगलावे, मदतनीस सौ. गीतांजली सावंत, आशा सेविका सौ. संजना सावंत यांच्यासह पालक सुमेधा पंडित, दीपा वरवडेकर, वेदांगी सावंत, सीमा धुरी, वीणा कानसे, लतिका बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी मंथन धुरी, कुणाल देसाई यांनी कृष्णाची वेशभूषा साकारली होती. दहीहंडी सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
निमजगा अंगणवाडीत बाल गोपाळानी साजरा केला दहीहंडी उत्सव…
