कुडाळ रेल्वेस्टेशन- आचरा बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी

⚡मालवण ता.२१-: कोरोना काळात बंद करण्यात आलेली कुडाळ आगाराची कुडाळ रेल्वे स्टेशन – मालवण कांदळगाव मार्गे आचरा ही वस्तीची बस फेरी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी कांदळगाव येथील ग्रामस्थ व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी यांनी राज्य परिवहन मंडळ सिंधुदुर्ग विभाग कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुडाळ आगाराची कुडाळ रेल्वे स्टेशन – मालवण कांदळगाव मार्गे आचरा ही वस्तीची बसफेरी गेली कित्येक वर्षे चालू होती. या बस मधून महाविद्यायीन व माध्यमिक चे विद्यार्थी, नोकरदार वर्ग व इतर प्रवासी प्रवास जारत होते. मात्र कोरोना काळात ही बस फेरी बंद करण्यात आली. त्यानंतर अद्यापपर्यंत ही बस फेरी सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थी, नोकरदार, रेल्वे प्रवासी, ग्रामस्थ यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी पुन्हा सुरू करून प्रवासहित जपावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

या निवेदनावर उमेश कोदे, सिद्धार्थ कदम, सतीश कदम, राजीव कदम, कुंदा तांबे, संजय कदम, ओंकार कांदळकर, जयेश परब, महेश वारंग, उदय परब, सौ. शीतल परब, रमेश मयेकर, संजय परब, प्रवीण परुळेकर आदी व इतर ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page