मंत्री दीपक केसरकर यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

सावंतवाडी येथे दुपारी ४ वाजता आयोजन;माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांची महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याच आयोजन सावंतवाडीत करण्यात आले आहे.याबाबतची माहीत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी आज येथे दिली. दरम्यान या भव्य सत्कार सोहळ्यात सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान देखील पोकळे यांनी केले
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबतची अधिक माहिती आशी की उद्या शनिवार १३ ऑगस्ट २०१२ रोजी सायं. ४ वाजता वैश्य भवन, शिवाजी चौक, गवळी तिठा, सावंतवाडी येथे हि. हा. श्रीमंत खेमसावंत भोंसले राजेसाहेब
यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. या भव्य सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन दीपक केसरकर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष
अॅड. सुभाष पणदूरकर व सर्व सदस्यांनी केल आहे.

दरम्यान या सत्कार सोहळ्यासाठी इतर पक्षांना देखील निमंत्रण केले असून हा कोणता राजकीय सत्कार नसून हा नागरिक सत्कार असल्याचा देखील पोकळे म्हणाले.

You cannot copy content of this page