भाजपची लोकप्रियता खुपनाऱ्यांकडूनच ईडी,सीबीआय नावाने ओरड ;ठाकरेंना गद्दरीचे फळ मिळाले

भाजपचे नेते,केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे प्रतिपादन

⚡कणकवली ता.१२-: ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही. भाजपची लोकप्रियता ज्याना आवडत नाही. तेच लोक ईडी,सीबीआय वगैरेच्या नावाने ओरड घालत आहेत. गेल्या ८ वर्षात एक लाख करोड पेक्षा जास्त संपत्ती जप्त केली गेली. ही संपत्ती ज्यांच्याकडे अवैध होती. वावमार्गाने मिळवली होती.तीच जप्त केली गेली आहे. असेच लोक भाजपविरोधात बोलता आहेत.पण याचा आमच्यावर काहीच परिणाम नाही. आमच सरकार, आमची पार्टी कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या कामात हस्तक्षेप करत नाही. सर्व संस्था स्वतंत्र आहेत असे स्पष्ट मत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
राणे कुटुंबीयांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,लोकसभा संयोजक अतुल काळसेकर,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.


महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला केलं. त्याचंच फळ त्यांना आता मिळतंय. त्यांनी जे लोकांसोबत केलं. ज्या प्रकारचा विश्वासघात केला. तसेच त्यांच्यासोबतही घडतंय. त्यांचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून गेलेत. माझी त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण हे त्यांच्याच कर्माचे फळ आहे असे भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये भाजपबरोबर युती करून निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याच बरोबर सरकार बनवण्यात आलं. यात भाजपची भूमिका कुठे चुकीची होती? बिहारमध्ये भाजपने नितीशकुमारांना हटवलं नाही असंही ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टी कधी निवडणुकीची तयारी करत नाही. आमच्यासाठी निवडणुका महत्वाच्या नाहीत तर लोकांसाठी सुविधा निर्माण करून येणाऱ्या पिढीला एक चांगला देश सोपवणे हा आमचा उद्देश आहे.असं म्हणत त्यांनी भाजपचा येत्या काळातील उद्देश स्पष्ट केला. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.त्यांनी प्रादेशिक पक्ष संपविण्याचे वक्तव्य केले नव्हते तर त्यांनी अस सांगितलं होतं की,जर प्रादेशिक पक्ष जनतेसाठी देशपातळीवरील सर्व प्रकारच्या योजना राबिण्यासाठी तयार नसतील आणि सरकारच्या योजना गरजवंतांपर्यंत पोचत नसतील तर निश्चितपणे याचे नुकसान प्रादेशिक पक्षांना होईल असे ते म्हणाले होते.

You cannot copy content of this page