गहाळ झालेला मोबाईल पोलिसांनी दिला शोधून…

मोबाईल मालकाने मानले पोलिसांचे आभार

⚡सावंतवाडी ता.११-: गडहिंग्लज ते गोवा या मार्गाने दुधाची गाडी घेऊन जात असताना धवडकी येथे त्या गाडीतील एका व्यक्तीचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबतची माहिती त्या गाडीची चालक धामणकर यांनी दाणोली चेक पोस्ट वरील अंमलदार अजित घाडी यांना दिली.

यावेळी त्यांनी स्वतः, प्रविण सापळे, विलास नर, प्रशांत आरोलकर, मयूर सावंत यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी शोध घेतला असता, सदर मोबाईल शोधून काढत मूळ मालक ओंकार गायकवाड यांच्या ताब्यात दिला आहे.

You cannot copy content of this page