Headlines

नेमळे ग्रामपंचायतीवर, पोस्ट कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला

लॅपटॉप नेला चोरून;चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान…

⚡सावंतवाडी ता.११-: नेमळे ग्रामपंचायत इमारतीला चोरट्यांनी लक्ष केले असून, ग्रामपंचायत मधील लेपटॉप चोरीला गेला असून, तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला असलेले पोस्ट ऑफिस देखील चोरट्यांनी फोडले आहे.

गेले अनेक दिवस तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून, पोलिसांना चोरट्यांना चेरबंद करण्यात यश येत नाही आहे. परंतु, आज चक्क शासकीय इमारतीत घुसत चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हानच दिलेले आहे.

दरम्यान, सावंतवाडी शहरासह तालुक्यात व जिल्ह्यात वाढलेल्या चोरी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याची माहिती नेमळे सरपंच विनोद राऊळ यांनी प्रहारशी बोलताना दिली.

You cannot copy content of this page