बचतगटातर्फे गावात स्वच्छता मोहीम, जनजागृती अभियान आले राबवण्यात…
⚡सावंतवाडी ता.११-: सावरवाड ग्रामपंचायतच्या वतीने काल अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हर घर तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सरपंच सौ.सुप्रिया मडगावकर यांचे हस्ते झाला.सावरवाड बचतगटाच्या माध्यमातून सावरवाड विठ्ठल मंदिर ते गांगेश्वर मंदिर ते आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच बचतगटाच्या माध्यमातून हर घर तिरंगा जन-जागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी उपसरपंच तेजस्विनी कुडतरकर,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दळवी,नयना लाड, तसेच ग्रामसेविका कु.मंदा खरात, ग्रामपंचायत कर्मचारी सौ.पूर्वा नाईक,भाऊ कुडतरकर,सुनिल परब, तसेच आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि बचतगटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
