त्यांना समाजाच्या “रखवालदारां” मध्ये दिसला भाऊ

झिरंग प्राथमिक शाळा नंबर ७ चा अनोखे रक्षाबंधन:पोलीस, डॉक्टर्स, नर्स, वृत्तपत्र सेवा देणाऱ्यांना बांधली राखी

⚡सावंतवाडी ता.११-:* बहिण भावाचे नाते दृढ करणारे रक्षाबंधन जणू हा सोहळाच असतो पण आजच्या युगात स्त्री पुरुष समानता चा धागा पकडून सावंतवाडी येथील झीरंग प्राथमिक शाळा नंबर 7. च्या मुलांनी जे समाजात जनतेचे रक्षण करतात जे रखवालदार आहेत अशा पोलीस डॉक्टर नर्स वृत्तपत्र सेवेतील पुरुष अधिकारी कर्मचारी तसेच महिला कर्मचारी नर्स यांच्या हाती राखी बांधून समाजाचे संरक्षण अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने तसेच स्त्री-पुरुष समानतेची ही नवी राखी बंधन करून अनोखा संदेश समाजापुढे आखून दिला आहे.

सावंतवाडीतील पोलीस निरीक्षक शंकर कोरे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर डॉक्टर सागर जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसीफ सय्यद उपनिरीक्षक श्री गोते पोलीस उपनिरीक्षक राजलक्ष्मी राणे तसेच महिला पोलीस कर्मचारी पुरुष त्याचबरोबर नर्स डॉक्टर वृत्तपत्र सेवेतील जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत संतोष खानोलकर अनिकेत गावडे स्नेहल चराटकर श्री परब दीपक बी रोड कर श्री धुरी आदींच्या हाती राखी बांधत रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम केला.

मुख्याध्यापिका मृगनयना सावंत ऐश्वर्या सावंत सुनिता खाडे नूतन गुरव अरविंद कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील 31 मुलांनी स्वतः राख्या तयार करून सावंतवाडी शहरात अनोखी राखी बंधन केले या मुलांचे कौतुक होत आहे स्त्री पुरुष समानतेचा नारा खऱ्या अर्थाने या शाळेच्या मुलांनी देऊन नवा अध्याय आखून दिला आहे.

You cannot copy content of this page