बाळकृष्ण पडवळ विजेता तर उपविजेता सचीन पेडणेकर

आचरा विभागीय नारळ लढविणे स्पर्धेचा आयोजन

⚡मालवण ता.१०-: शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आचरे तिठा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नारळ लढविणे स्पर्धेत बाळकृष्ण पडवळ यांनी विजेतेपद पटकाविले तर सचीन पेडणेकर हे उपविजेते ठरले

शिवसेना आचरा विभागाच्या वतीने
स्पर्धा संपन्न झाली. आचरा तीठा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेतेपद बाळकृष्ण पडवळ यांनी पटकाविला यांना विनायक परब पुरस्कृत रोख रु. ४,०००/- देऊन सन्मानित करण्यात आले तर सचीन पेडणेकर
हे उपविजेते ठरले त्यांना राजन पांगे पुरस्कृत रु. ३०००/- रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे विशेष बक्षीस सलग १० नारळ फोडणाऱ्यास गजानन गांवकर यांस कडून ५०००/- असे पारितोषिक ठेवण्यात आले होते व ह्या बक्षिसाचे विजय कदम व नंदकिशोर सावंत हे दोघे जण या बक्षिसाचे मानकरी ठरले. माजी जी.प. सदस्य श्री हरी खोबरेकर हस्ते पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले.

या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते संपन झाला , या स्पर्धेत ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला असून नारळ लढविणे स्पर्धा हि आचरे गावात प्रथमच पार पडली आहे व या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसात लाभला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लबदे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, मच्छिमार नेते नारायण कुबल, विनायक परब, राजन पांगे, जगदीश पांगे, श्याम घाडी, दिलीप कावले, गणेश तोंडवळकर, सचीन रेडकर, प्रशांत गांवकर, राजू नार्वेकर, चंदन पांगे व अन्य उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून हर्षद धुरी, निलेश मांजरेकर व सागर परुळेकर यांनी काम पाहिले

You cannot copy content of this page