आ नितेश राणे;शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे आरोप केले इग्नोर
⚡मुंबई दि.०६-: हिंदूत्वसाठी सर्व माफ आहे. आमच्यासाठी राज्यात हिंदूत्वाचं सरकार असणे आमच्या काळाची आणि महाराष्ट्राची गरज आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंना टार्गेट केले जायचे. आम्हाला सण पण साजरे करायला मिळायचे नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. एक प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत. हिंदूत्वचे रक्षण करणे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे, असे म्हणत नितेश राणेंनी केसरकरांचे आरोप थेट इग्नोर केले आहेत. आमदार नितेश राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
