देवगड तालुक्यात एकूण १७६३ मि. मी.नोंद

२४ तासात ५० मि. मी मुसळधार पाऊसाची नोंद!

⚡देवगड ता.०६-: देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरात शनिवार सकाळी १० वाजेपर्यंत पडलेल्या २४ तासातील पावसाची नोंद ५० मि.मी एवढी झाली आहे.तर आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची नोंद १७६३ मि. मी एवढी झालीं आहे.


शनिवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या मुसळधार धुवांधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली देवगड जामसंडे मध्यवर्ती भागात फाटक क्लास नजिक पुन्हा पाण्याची पातळी वाढली होती.तर तालुक्यातील वाडा येथील पुला नजीकच्या भागात पावसाचे पाणी साचल्याने तसेच दाभोळे व अन्य सखल मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने काही काळ वहातुक ठप्प झाली.

होती .अन्य कोणत्याही स्वरूपाची हानी झाली नाही.देवगड तहसीलदार कार्यालयात २४ तास आपत्कालीन कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे.

You cannot copy content of this page