भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आजगाव ग्रामपंचायतच्यावतीने आयोजन
⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ-: १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आजगाव ग्रामपंचायतच्यावतीने जि.प.केंद्रशाळा आजगाव नं. १ येथे देशभक्तीविषयक प्रेरणा निर्माण करण्याच्या हेतूने दुपारी २:३० वाजता शालेय विद्यार्थ्यांत देशभक्तीविषयक जाणीव, जागृतीसाठी देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील यशस्वी संघांना रोख रक्कम,प्रशस्तीपत्र आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
ही स्पर्धा इयत्ता पाहिली ते आठवीच्या गटात होणार आहे. या स्पर्धेची वेळ दुपारी २:३० ते सायं.५:०० अशी असून,सादरीकरण वेळ ५ ते ७ मिनिटे राहील.
या स्पर्धेसाठी बक्षिसे प्रथम क्रमांक:- रोख रु.१५००/- प्रमाणपत्र व चषक, द्वितीय क्रमांक रोख १०००/- व प्रमाणपत्र व चषक, तृतीय क्रमांक रोख ५००/- प्रमाणपत्र चषक तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकसाठी रु.३००/- प्रमाणपत्र व चषक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे नियम व स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठीआजगाव सरपंच श्रीम.सुप्रिया वाडकर/मेस्री-९४२००४९७३८, आजगाव ग्रामसेवक श्री.संदीप गवस- ९४२३५१३६७७, श्री. दत्तगुरु कांबळी सर-९४२१६३१२०४ यांच्याशी संपर्क साधावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
