एस टी प्रशासन कृतिशून्य…

अनिल चव्हाण यांचा गंभीर आरोप

⚡आंबोली, ता.०६-: एस टी प्रशासनाचा कारभार हा नियोजनशून्य असून धिम्म प्रशासन असून खुशहाल पने कारभार अधिकाऱ्यांचा सुरू आहे.खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांच्या कानात आणि डोक्यात जात नाही. कृतीशून्य कारभार असून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊन देखील वारंवार सांगून देखील बस सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याविरोधात कणकवली येथील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषणाला सोमवारी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

संबंधित अधिकारी हे निष्क्रिय असून त्यांची यावरून कामात चालढकल दिसत आहे.गुरुवार पर्यंत थांब असे सांगण्यात आल्याने वाट बघितली मात्र धिम्म प्रशासनाचा अनुभव पालकांना आणि विद्यार्थी यांना आला आहे.अशा अधिकाऱ्यांना जाग येत नाही.महाविद्यालय सुरू होऊन कित्येक दिवस झाले तरी बस सुरू नाही.त्यामुळे अधिकारी झोपले आहेत का असा सवाल पालकांमधून आता विचारला जात आहे. दरम्यान या विरोधात परिवहन विभागाला जाग येण्यासाठी अनिल चव्हाण यांनी सोमवारी उपोषणाचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page