होवून जाऊंदे: राजीनामा देवून निवडणूक लढवा

पाहूया सत्ते जिंकते की सत्ता;आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांना नाव न घेता आवाहन

⚡सावंतवाडी ता.०१-: रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.

You cannot copy content of this page