खासदार विनायक राऊत यांची केसरकरांवर जोरदार टीका
⚡सावंतवाडी ता.०१-: उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीत सभा झाली नसती तर केसरकर यांचे त्यावेळी विसर्जन झाले असते, अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. दरम्यान येणाऱ्या निवडणूकीत या आमदाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, अस असे विनायक राऊत म्हणाले.
अदित्य ठाकरे हे आज निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी आले असता यावेळी आयोजित सभेत खासदार विनायक राऊत बोलत होते.
यावेळी विनायक राऊत बोलताना म्हणाल, केसरकर यांनी दहा वर्षांत काय केले मतदारसंघासाठी काय हे जाहीर करा फक्त जनते समोर मोठ मोठ्या घोषणा करणे हेच काम केसरकर यांनी १० वर्षांत केले. सेटअप बॉक्स चष्मा चा कारखाना आभार होता त्याच काय झाल असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.दरम्यान या बंडखोर आमदारांनी केलेली गद्दारांना महाराष्ट्रातील जनता गाडला शिवाय राहणार नाय असे राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
