भंडारी हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांकडून भूमी आचरेकर हिला आर्थिक मदत

⚡मालवण ता.३१-: गरिबीशी झुंज देत प्रतिकूल परिस्थितीत दहावी परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवून यश मिळविणाऱ्या कांदळगाव येथील भूमी आचरेकर या विद्यार्थीनीला तिच्या पुढील शिक्षणासाठी भंडारी ए. सो. हायस्कूलच्या सन १९७१-७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली.

कांदळगाव येथील भूमी आचरेकर या प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. तिची आई मालवण येथील माघी गणेश मंदिरासमोर फुले व पूजा साहित्य विकून आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करते. अशा परिस्थितीत पुढील शिक्षण घेण्यासाठी भूमी हिची आर्थिक परिस्थिती नसल्याने भंडारी हायस्कूलच्या १९७१-७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी भूमी हिला मदतीचा हात दिला आहे. भंडारी हायस्कूलचे माजी शिक्षक कै. वसंतराव परूळेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त माघी गणेश मंदिर येथे रोख २० हजार रुपयांची मदत भूमी आचरेकर हिच्याकडे माजी विद्यार्थ्यांनी सुपूर्द केली. यावेळी भूमी हिची आई भाऊ तसेच माजी विद्यार्थी विष्णू कोरगावकर, अरुण भोगले हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page