⚡मालवण ता.३१-: मालवण तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा सत्कार प्रतिवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित केलेला आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व अन्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले असल्यास तेही विद्यार्थी सत्कारास पात्र असतील. ७५ टक्केहून अधिक गूण मिळविणाऱ्या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच इतर क्षेत्रातही विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यापारी पाल्यांचादेखील सत्कार करण्यात येणार आहे. व्यापारी बांधवांनी गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह आपल्या पाल्यांची नावे कार्यवाह रवी तळाशिलकर, खजिनदार गणेश प्रभूलकर यांच्याकडे दि. ७ ऑगस्टपर्यंत द्यावीत, असे आवाहन मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे.
