केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये आडवली शाळेचे यश

⚡मालवण ता.३१-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा आडवली नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते चौथी- द्वितीय-धम्मतेजा पल्लव कदम, तृतीय-मनस्वी पल्लव कदम. निबंध स्पर्धा पहिली ते चौथी- प्रथम- मनस्वी पल्लव कदम, पाचवी ते सातवी- तृतीय-विक्रांती प्रवीण साटम, मनस्वी कदम आणि विक्रांती साटम यांच्या निबंधांची मालवण तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक बोंडे आणि श्रीमती तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती आणि प्रशालेने अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page