प्रणय राणेची यु मुंबा संघात निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी

यंगस्टार मित्रमंडळातर्फे कणकवलीत प्रणय राणेचा सत्कार सोहळा

⚡कणकवली ता.३१-: प्रो कबड्डीच्या ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन . वाय . पी . कॅटेगरीमधून यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याची निवड झाली आहे . प्रणयची निवड कणकवली तालुक्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरारोवणारी आहे . प्रणय राणे याची निवड झाल्याबद्दल मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला व मंडळाला याचा सार्थ अभिमान आहे प्रणय राणे याने कबड्डी खेळात अष्टपैलू कामगिरी करुन यंगस्टारचे नाव मोठे केले आहे आता मंडळाच्या कबड्डीपटूंची भविष्यात प्रो कबड्डी व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये निवड होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा यंगस्टार मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य तथा कबड्डीपटू अनिल हळदिवे यांनी व्यक्त केली .

प्रो कबड्डीचे ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन.वाय.पी. कॅटेगरीमधून कणकवलीचा सुपुत्र व यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याची निवड झाली आहे याबद्दल यंगस्टार मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार सोहळा येथील भालचंद्र महाराज संस्थाच्या सभागृहात आयोजित केला होता या प्रसंगी श्री हळदिवे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर श्री काशिविश्वेवर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड प्रवीण पारकर , यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे ,प पू . भालचंद्र महाराज संस्थानाचे व्यवस्थापक विजय केळुसकर , जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे , मंडळाचे उपाध्यक्ष भैय्या आळवे , विनय राणे गणपत मालंडकर , माजी नगरसेवक अमय राणे , नितीन केळुसकर , रुपेश परब , अस्मिता राणे- दळवी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य व प्रणयचे कुटुंबीय उपस्थित होते
अनिल हळदिवे म्हणाले , प्रणय हा यंगस्टाराचा कबड्डीपटू असून आता त्याची प्रो कबड्डीसाठी यु मुंबा संघात एन.वाय.पी. कॅटेगरीमधून निवड झाली आहे . भविष्यात त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत निवड होण्यासाठी मेहनत घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

अॅड . प्रवीण पारकर म्हणाले , प्रो कबड्डीसाठी यंगस्टारचा खेळाडू प्रणय राणे याचीनिवड झाली ही बाब कणकवली व सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे . कबड्डी खेळातील प्रणयची ही झेप कौतुकास्पद आहे . भविष्यात त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प्रतिनिधित्व करावे .
अण्णा कोदे म्हणाले, सिंधुदुर्गातून राज्य व राष्ट्रीय कबड्डीपटू तयार व्हावे याकरिता गेली ४० वर्षे यंगस्टार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे . यंगस्टारचा खेळाडू प्रणय राणे याची प्रो कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याने मंडळाने आजपर्यंत घेतलेल्या स्पर्धांचे सार्थक झाले आहे .

रमेश जोगळे म्हणाले , प्रणयने आता यंगस्टारचे कबड्डीपटू भविष्यात प्रो कबड्डी , व आतंरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची निवड व्हावी याकरिता त्यांना मार्गदर्शन अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . प्रणयचे वडिल विनय राणे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रणयचा या यशामध्ये यंगस्टरांचा सिंहाचा वाट असून यंगस्टारमुळे त्याची ओळख सर्वदूर झाली प्रणयच्या या यशाचे श्रेय यंगस्टरला जाते . एक सर्वसामान्य कबड्डीपटू असून प्रो कबड्डी स्पर्धेच्या निवडपर्यंत यशस्वी प माझ्या कुटुंबीयांचा व यंगस्टारचा मोलाचा वाटात असल्याचे त्याने आवर्जून सांगितले
यावेळी यंगस्टार मित्रमंडळ व अमय मित्रमंडळातर्फे प्रणय राणे याला पुष्पगुच्छ , शाल , श्रीफळ व भालचंद्र महाराज प्रतिमा देऊन त्याचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले . यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You cannot copy content of this page