सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.३१-: जनतेचा भलं करणाऱ्या विचाराच राजकारण आणि नेते आज देशभरात विविध विषयांनी गाजत आहेत मात्र महागाई बेरोजगारी आणि आरोग्य सुविधा याबाबत कोणालाही गांभीर्य नसून राजकारण जोमात आणि युवा पिढी कोमात अशी म्हणण्याची वेळ आली बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्येची संख्या वाढवली असून हे थांबवायची असल्यास राजकारण व नेत्यांचा विचार न करता आपल्या युवा पिढीच्या नैराश्येचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे या युवा पिढीला अडकलेल्या समस्येतून सुखरूप बाहेर काढून युवा पिढी जगऊ व देश वाचून असा संदेश सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिला आहे.
