Headlines

रखडलेले शाळेच बांधकाम लवकर पूर्ण करणार…

जि .प. अध्यक्ष प्रमोद कामत:शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान..

⚡सावंतवाडी ता.११-: कै. सुधाताई कामत शाळा नं. २ च्या शिष्यवृत्ती परिक्षेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी शाळेला भेट दिली. सर्व मुलांचे त्यांच्या पालकांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. तर शाळा इमारतीचे रखडलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली आहे.

प्रितेश राऊळ यांनी या शाळेने केलेली ही कामगिरी इतर सर्व शाळांसाठी प्रेरणदायी आहे. तसेच शाळा इमारतीचे रखडलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वोतपरी सहकार्य करू असे सांगितले.तर जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले, जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी या शाळेतील सर्व पालक, शिक्षक विद्यार्थी एकजुटीने काम करीत आहे. त्यामुळेच हे भव्य दिव्य यश शाळेने मिळविले आहे असे सांगितले. आपण सर्व एकत्रित प्रयत्नाने लवकरात लवकर शाळा बांधकाम पूर्ण करू असे सांगितले. तसे जिल्हा परिषद स्तरावरून भाडे मंजूर करून नवीन शाळा बांधकाम होईपर्यंत भाडे तरतूद आम्ही करू असे सांगितले. मुलांसोबत शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान त्यांनी केला. शिक्षकांनी केलेली ही कामगिरी अभूतपूर्व आहे असे सांगितले. तसेच शिक्षकांचा सन्मान जिल्हा परिषदेत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी वाफोली उपसरपंच श्री. गवस, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ राज्य उपाध्यक्ष म. ल.देसाई, ॲड. संजू शिरोडकर, नंदू गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित सावंत उपाध्यक्ष मीना दाभोलकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांनी केले.

You cannot copy content of this page