दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत

⚡देवगड ता.३०-: शेठ म -ग हायस्कूलच्या १९९८-९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व वह्यांची मदत आज देण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थिनी शीतल वैशंपायन व स्वाती पाटणकर या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या वर्ग मित्रांच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

ही दहावीची बॅच गेली दोन वर्षे सातत्याने शाळेशी संपर्क साधून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या लक्षात घेऊन सातत्याने ही मदत करीत आहेत. शाळेविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांनी राबवलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे असे विचार मुख्याध्यापक श्री संजीव राऊत यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी पर्यवेक्षक तानाजी पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या या देणगी बद्दल या माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
फोटॊ -गरजू विद्यार्थ्यांना मदत करताना मान्यवर

You cannot copy content of this page