कोकण रेल्वे रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजविले

रिक्षा व्यावसायिक व रानबांबुळी ग्रामस्थांचा पुढाकार

⚡ओरोस-: कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग रटेशन वर जाणाऱ्या रस्त्याचे गेले अनेक वर्ष डांबरीकरण करण्यास दिरंगाई करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अखेर रिक्षा व्यावसायिक आणि येथील रानबांबुळी ग्रामस्थ यांनी अंगमेहतीने ग्रिट खडी मारून खड्डे बुजविले प्रशासनाच्या या दिरंगाई कारभाराबाबत कमालीची नाराजी वयक्त होत आहे.

कोकण रेल्वे मार्गाच्या सिंधुदुर्ग रेल्वे रटेशन कडे जाणारा रस्ता गेलीएक दोन वर्षे खड्डेमय बनला आहे,खड्डे संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे .या मार्गावरून नियमित रेल्वेच्या खडी वाहतूक करणारे डंपर सतत ये-जा करत असतात त्यामुळे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे.

या मार्गाची दुरुस्ती व्हावे ,डांबरीकरण व्हावेदुरुस्ती व्हावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी, रिक्षा व्यावसायिकांनी खासदार आमदार यांच्याकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना रिक्षा व्यावसायिकांना वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. रेल्वे प्रवासासाठी येणाऱ्या प्रवाशांची ही गैरसोय,खड्डेमय रस्त्यांमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती या प्रश्नाकडे येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भाई सावंत रिक्षा व्यावसायिक यानी लक्ष वेधले व सदर रस्ता तातडीने डागडुजी होणे आवश्यक आहे, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात येणार आहेत, दिवस-रात्र सुरू होणारी रेल्वे वाहतूक रस्त्याच्या समस्येमुळे रिक्षा व्यावसायिकांना रिक्षा चालविणे वाहन चालकांना वाहन चालविणे कठीण होऊन बसणार आहे अशी या समस्येकडे भाई सावंत यांनी२ डंपर ग्रिट आणि खडी स्वखर्चाने दिली . व त्यानंतर रिक्षा व्यवसायिक आणि त्यामुळे ग्रामस्थ यानी अंग मेहनत श्रमदानातून सदर खड्ड्यां मध्ये ग्रिट खडी भरून खड्डे बुजविले या समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष देणे वेधने गरजेचे आहे ,लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, काही दिवसांपूर्वी रिक्षा व्यावसायिकानी जिल्हा प्रशासनाचे ही एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचेजाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थ आणि रिक्षा व्यवसायिक यांचे म्हणणे आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रेल्वे स्टेशन कडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करतात असा सवाल स्थानिक ग्रामस्थ रिक्षा व्यावसायीक आणि प्रवासी वर्गातून होऊ लागला आहे.

You cannot copy content of this page