दयानंद मांगले;सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होत असलेला सत्कार म्हणजे सत्काराचे स्वरूप काय आहे यापेक्षा आपल्या समाजाने गुणवंत विद्यार्थ्यांचे पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ही त्या गुणवंतांना प्रेरणा देणारी असते. हेच कार्य हीच परंपरा सिंधुदुर्ग जैन परिवाराने गेली कित्येक वर्षे जोपासली असून विविध उपक्रमांद्वारे जैन समाज बांधवांना एकत्रित करून प्रेरणा देण्याचे कार्य या जैन परिवाराच्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे.ही बाब जैन समाजाला गौरवास्पद आहे.असे प्रतिपादन दिगंबर जैन कासार समाज संस्था कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांनी सिंधुदुर्ग नगरी (ओरोस)येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या वेळी व्यासपीठावर समाज बांधव सल्लागार बाळासाहेब डोर्ले,रवींद्र पोकळे,अशोक ठोबरे,अनिल खुटाळे,सिंधुदुर्ग जिल्हा जैन कासार समाज अध्यक्ष सुनील त्रिभुवणे ,उपाध्यक्ष अमोल साळवी,सरचिटणीस दिपराज बिजितकर,राजाराम दंताळ,संजय मुधाळे,प्रसिद्धी प्रमुख चंद्रप्रभ बोगार,महिला अध्यक्षा पौर्णिमा मांगले,उपाध्यक्ष चैत्राली बोगार,सचिव दीपिका बिजितकर उपस्थित होते.
नमोकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात होऊन प्रास्ताविक बाळासाहेब डोर्ले,यांनी सूत्रसंचालन स्वागत सौ पद्मा दंताळ यांनी केले.या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यात आर्या लक्ष्मण बोगार,मृदुला मुकुंद बोगार,पूजा अमित वणकुद्रे,(दहावी)सानिका सुनील मांगले,साक्षी कृष्णा त्रिभुवणे,नागराज प्रशांत दंताळ(बारावी)प्राजक्ता चंद्रप्रभु बोगार,(पदवी)यांचा समावेश होता यावेळी गुणवंतांनी मनोगत व्यक्त केले जैन कासार समाज जिल्हा अध्यक्ष सुनील त्रिभुवणे,व अन्य उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या या निमित्ताने महिला सदस्या सौ .मनीषा त्रिभुवणे,सौ. पौर्णिमा मांगले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार सोहळ्यास जेष्ठ समाज भगिनी श्रीमती ,सुवर्णा मुधाळे,सुमती पाटील उपस्थित होत्या.
