⚡बांदा ता.३०-: तालुक्यातील तांबोळी येथील वरचीवाडी येथे राहणाऱ्या एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री घडली असून, त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक केंद्रात केंद्रात दाखल केले होते.
त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी बांबुळी येथे हलविण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने अखेर त्याचे निधन झाले आहे.
