देवगड शिक्षण विभाग अपहार प्रकरणी तिघांना अटक

देवगड (प्रतिनिधी)
देवगड पंचायत समितीच्या अधिपत्याखाली असलेल्या शिक्षण विभागातील अपहार प्रकरणी देवगड पंचायत समिती शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक, उपशिक्षक व परिचर यांना आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग यांनी तपासकामी अटक केली आहे .यातील उपशिक्षक विष्णू सर्जेराव पाळवदे (४०)यांना न्यायालया हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली असून यातील अन्य आरोपी कनिष्ठ सहाय्यक गंगाधर पावनां अल्लमवार (४२) यांना तसेच परिचर मधुकर दाजी राजम (६६) यांना शुक्रवारी सायंकाळ नंतर आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग यांनी महिला पोलीस निरीक्षक आर जी नदाफ यांचे मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की देवगड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला भांदवी कलम ४२०,४०३,४६५,४६७,४७१,
४७७ (अ),३४ या गुन्ह्यातील फिर्यादी प्रजापती शामराव थोरात गटशिक्षणाधिकारी प्रभारी पंचायत समिती देवगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील आरोपी यांनी एकमेकांचे संगणमताने व सहाय्याने दिनांक२ एप्रिल २००८ ते ३१ मार्च २०१६ रोजी सायं. ६ वाजेपर्यंत या कालावधीत देवगड पंचायत समितीचे शिक्षण विभागात कार्यरत असताना ३ शिक्षण मुलोदय या लेखाशीर्ष खाली वेतन देयका संदर्भात स्वतःचे फायद्यासाठी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने शासकीय पगाराचे यादीत नावे नमूद करून त्याबाबतचे कागदपत्रांचे बनावटीकरण करून तसेच खोटे दस्तावेज तयार करून खोटे हिशोब तयार करून त्याद्वारे अतिप्रदान असलेली रक्कम खात्यावर जमा करून ती स्वतःचे फायद्यासाठी वापरून १ कोटी ८८लाख ४७ हजार १३२/- रुपयांचा अपहरण करून फसवणूक केलेली असून सदरची रक्कम व त्यावरील व्याजासही ३ कोटी २१ लाख ७८हजार ५७१/- रुपयांचा एकूण अपार केलेला असल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात गुन्हा देवगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपी विष्णू सर्जेराव पाळवदे राहणार जिल्हा परिषद शाळा अडसूळ वाडी, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांचे गुन्ह्याचे कामे २९जुलै २०२२ रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या अपहारप्रकरणी देवगड पंचायत समिती शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक गंगाधर आलंमवार आणि परिचर मधुकर राजम यांनाही आर्थिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग यांनी तपासकामी अटक केली आहे.

You cannot copy content of this page