⚡देवगड ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इर्शाद शेख यांची ओरोस येथे देवगड तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आढावा घेण्यासाठी लवकरच देवगड तालुक्यात येऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ, असे यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले.
या वेळी प्रदेश काँग्रेस महिला प्रतिनिधी सुगंधा साटम,तालुका अध्यक्ष उल्हास मणचेकर,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश देवगडकर,विधानसभा प्रमुख रशीद खान ,शहर अध्यक्ष उमेश कुळकर्णी, बाळकृष्ण चव्हाण उपस्थित होते.
