जलसंधारण विभागमध्ये ठराविक ठेकेदाराची प्रचंड दादागिरी;

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार: राजन तेली

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागमध्ये ठेकेदाराची प्रचंड दादागिरी चालली आहे?सरकारी पैशांची लूट चालली आहे.या जलसंधारण कामांमध्ये मोठी साखळी कार्यरत आहे.या जलसंधारण कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे.आता राज्य सरकारने ३०० कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.काही ठेकेदार स्वतःच कामे मजूर करुन आणतात,अधिकारी व या ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंधारणच्या कामांची चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

कणकवली येथील भाजपक कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते.
राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात.त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा लागल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत.सरकारने घोडगे,सावडाव ,भिरवंडे- गांधीनगर व वैभववाडी नावळे,दिंडवणे असे ५ प्रकल्प आहेत.जलसंधारण विभागात या कार्यालयात रिंग करत काही ठेकेदार काम करतात.धरण करतात पण भूसंपादन होत नाही.शेतकऱ्यांना पैसे अद्यापही मिळत नाही.मात्र,सरकारी पैशाचा गैरव्यवहार करत आहेत,असा आरोप राजन तेली यांनी केला.

सावडाव येथील प्रकल्प २०१० सालात धरण झाले,आता दुरुस्ती केली जात आहे.या सगळ्या प्रकल्पात करंजे, कुंभवडे,कुडाळ वर्दे,आब्रड,शिरवल हे धरण प्रकल्प आजही भूसंपादन नाही.तरी काम चालू आहे.यामागे ठेकेदार लूट करत आहेत,असेही श्री.तेली यांनी सांगितले.

या प्रकल्पात गेली २४ वर्षात पाणी साटलेलं नाही.याला जबाबदार कोण?ठेकेदार वरुन काम मंजूर करुन आणतात.नॉन महाराष्ट्रायीन लोक काम करतात.या कामांचे ऑडिट होते का नाही? जमिन किती ओलीताखाली येत? जलसंधारण कामे होतात त्याचे ऑडिट झाले पाहिजे,अशी मागणी करणार असे राजन तेली यांनी सांगितले.

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत.काय उपयोग ?पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नाही त्या ठिकाणी ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे.किमान कोकणात झालेले प्रकल्प आहेत,त्यात पाणी किती साठते? त्याचा आढावा सरकारने घ्यावा,पर्दापाश झाला पाहिजे.जलसंधारण मुख्य अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची चौकशी करावी. याबाबत तक्रार पत्र इमेल करणार आहे.जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात,त्यांची दादागिरी थांबली पाहिजे,अशी मागणी करणार असे राजन तेली यांनी सांगितले.

You cannot copy content of this page